कृषि उत्पन्न बाजार समिती गडचिरोलीचे प्रथम अधिसुचना दिनांक 12 जुन 1961 मा. डी . एच. देशमुख कमीर्शनर नागपूर विभाग नागपूर राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली. त्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी रामक्रिष्ण जिल्हा चांदा यांनी दिनांक 23 ऑक्टोबंर 1961 राजपत्रात दर्शविलेल्या एकुण 26 गावाचा समावेश असलेली बाजार समिती स्थापन झाल्याची अधिसुचना राजपत्रात प्रसिध्द केली. मा. डायरेक्टर ऑफ ॲग्रीकलचर मार्केटिंग ॲण्ड रुरल फायनान्स महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक 28 नोव्हेंबर 1970 च्या अधिसुचने द्वारे बाजार समितीचे गडचिरोलीचे कामकाजाला प्रत्यक्षात सुरवात झाली.
मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली यांनी दि.4 फेब्रुवारी 1999 ला महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात गडचिरोली बाजार समितीचे विभाजन करुन स्वतंत्र्यरित्या गडचिरोली बाजार समितीमध्ये गडचिरोली तालुक्यातील 126 व धानोरा तालुक्यातील 227 असे एकुण 353 गावांचा समावेश असलेली गडचिरोली बाजार समिती व दुसरी बाजार समिती चामोर्शी यात चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील 274 गावांचा समावेश असलेली स्वतंत्र चामोर्शी बाजार समितीची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे.
गडचिरोली बाजार समितीचे कार्यक्षेत्रात प्रामुख्याने भात (धान) या शेतमालाचा उत्पादन होते . गडचिरोली तालुका बिगर आदिवासी क्षेत्रात मोडत असून धानोरा तालुका हा संपूर्णपणे आदिवासी क्षेत्रात मोडत असून या ठिकाणी प्रामुख्याने आदिवासी विकास महामंडळ यांचे अंतर्गत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांचे 9 + 3 = 12 खरेदी केंद्राअंतर्गत शासनाचे हमीभाव खरेदी योजने नुसार शेतमालाची खरेदी विक्री केली जाते. तसेच गडचिरोली तालुक्यात बिगर आदिवासी क्षेत्रात शासनाचे 3 हमिभाव खरेदी केंद्राअंतर्गत जिल्हा मार्केटिंग अधिकारी , गडचिरोली यांचे मार्फत शेतमालाची खरेदी केल्या जाते . तसेच अ प्रतीच्या धानाची व्यापाऱ्या अंतर्गत खुल्या बाजारात खरेदी विक्री केल्या जाते .
सन 2025-2026 मध्ये बाजार समिती मध्ये व्यापारी नुतनिकरण – 204 , नविन व्यापारी – 26 , अडत्या नुतनिकरण – 4, प्रक्रिया नुतनिकरण – 14 , प्रक्रिया नविन – 4 , वखारवाला – 1 , गोदाम धारक – 1 व हमाल – 13 अशाप्रकारे लायसन्स दिलेल्या आहेत. सन 2025-2026 मध्ये बाजार समितीचे उत्पन्न 1,40,60,921.00 खर्च रुपये 1,21,15,380.70 व वाढावा 18,92,540.30 एवढे झालेले आहेत.
सन 2024-2025 मध्ये आदिवासी विकास महामंडळ यांचे मार्फत 107232.16 क्विंटल धान खरेदी रक्कम रुपये 25,30,22,498.00 व जिल्हा मार्केटिंग अधिकारी , गडचिरोली यांचे अंतर्गत 37346.60 क्विंटल खरेदी रक्कम 8,75,74,763.00 झालेली आहे. तसेच खुल्या बाजारात व्यापाऱ्या अंतर्गत वजन 3,32,160.00 क्विंटल खरेदी रक्कम रुपये 84,70,09,800/- ऐवढी झालेली आहे.
